खंबायत संस्थान
खंबायत संस्थान : स्वातंत्र्यपूर्व काळातील हिंदुस्थानातील एक संस्थान. आधुनिक गुजरात राज्यात पूर्वीच्या खेडा एजन्सी विभागात ते होते. याची लोकसंख्या ९६,५०१ (१९४१) असून क्षेत्रफळ सु. ८१० चौ. किमी. होते. दोन शहरे व ८८ खेडी असलेल्या या संस्थानचे उत्पन्न सु. ९,६७,००० रु. होते.